संत ज्ञानेश्वर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न .
"अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी स्नेह सम्मेलनाची गरज" गणेश दादा हाके पाटील भाजपा प्रदेश प्रवक्ते .
अहमदपूर दिनांक 9 मार्च 2020 शालेय स्तरावर अभ्यासासोबत विद्यार्थ्यांमधील विविध कलागुण शोधून त्यावर योग्य संस्कार करून येणाऱ्या पिढीतून अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शाळाशाळांमध्ये स्नेहसम्मेलन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांनी केले.
ते दिनांक 8 मार्च रोजी संस्कृती मंगल कार्यालयात संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून भाजपाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष गोविंदराव केंद्रे ,प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, पंचायत समितीच्या सभापती गंगासागर जाभाडे,चाकूर पंचायत समितीच्या सभापती जमुनाबाई बडे, नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे , चाकूर पंचायत समितीचे उपसभापती सज्जन कुमार लोणाळे , माजी सभापती आयोध्या ताई केंद्रे ,भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राचार्या रेखाताई तरडे, केंद्रप्रमुख नाथराव ढाकणे,ऐजाज बक्षी, नगरसेविका उपाध्याय ताई, प्रा. हणमंत देवकत्ते, विषयतज्ञ ज्ञानोबा सुक्रे सह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला दिनानिमित्त सावित्री-जिजाऊ व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
गणेशदादा हाके पुढे बोलताना म्हणाले की, कला ही जीवनाची सावली आहे.कलेमुळे माणूस अमर राहतो. म्हणून विद्यार्थ्यांनी विविध कला गुण जोपासले पाहिजेत प्रदेश उपाध्यक्ष गोविंद अण्णा केंद्रे यांचे उदघाटन पर भाषण झाले. .
देवा श्री गणेशा या बहारदार गीताने विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. दप्तराचे ओझे ही नाट्यछटा सर्वधर्मसमभाव हा मुक अभिनय , देशभक्तीपर गीत, स्वच्छता गीत, कोळीगीत, लावणी, शेतकरी गीत, लोकगीत, आदिवासी नृत्य, राजस्थानी गीत, पंजाबी भांगडा सह विविधतेतून एकता दाखविण्यात आली. कार्यक्रमातून मनोरंजनासोबत सामाजिक प्रबोधन करण्यात आले .एकापेक्षा एक सुंदर गीतातून विद्यार्थ्यांनी आपली नृत्यकला सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली .
या बाल कलाकारांचे कौतुक पाहण्यासाठी महिला पालक, पुरुष पालक, डॉक्टर, वकिल, शिक्षक,सामाजिक कार्यकर्त्यासह सुजान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . महिला दिना निमित्त उपस्थित सर्वच महिलांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे चित्रप्रदर्शन ही भरविण्यात आले होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे व आर्चना जांबळदरे यांनी केले आभार संगीता आंबदे पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक उद्धव शृंगारे, मीना तोवर , परमेश्वर पाटील, राजकुमार पन्हाळे, जिलानी शेख, राजाराम बुर्ले, संतोष मुळे सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
संत ज्ञानेश्वर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न . "अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी स्नेह सम्मेलनाची गरज" गणेश दादा हाके पाटील भाजपा प्रदेश प्रवक्ते .