*नम्रता जगदीश सावळे (पटणे)* *कोल्हापूरच्या "नॅशनल* *युनिटी अवॉर्ड" पुरस्काराने सन्मानित*
बारामती (शारदानगर): उदगीरच्या सुपुत्री व सध्या बारामती येथे कार्यरत असलेल्या सौ नम्रता जगदीश सावळे(पटणे) या शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर,बारामती येथील माध्यमिक विभागात गणिताच्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, गणिताचे अध्यापन करीत असतानाच त्यांनी त्यांचा आवडता छंद जोपासला आहे. कविता करणे हा त्यांचा आवडता छंद आहे व त्यांच्या अनेक कविता व्हाट्सअप फेसबुक सारखी प्रसारमाध्यमे ,विविध न्यूजपेपर्स, दिवाळी अंक, विविध मासिके इत्यादी च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचले आहेत, त्या समाजातील व जीवनातील विविध विषयांवर साध्या भाषेत पण अतिशय सुंदर, हृदय स्पर्शी काव्य रचना करतात, हेच त्यांच्या काव्य लेखनाचे विशेष आहे. त्यांच्या याच कलेचा गौरव म्हणून कोल्हापूरच्या आदर्श फाउंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेकडून मराठी सिने अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या शुभहस्ते त्यांना "नॅशनल युनिटी अवॉर्ड" देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगरचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सूर्यकांत मुंडे सर, निंबाळकर सर, थोरात सर, साबळे सर, गोरेताई, जगदाळे ताई, शिंदे सर, कातोरे सर, ज्योत्स्नाताई, गवळीताई, कांचनताई, हिरवे ताई, काटकर ताई, अडागळे ताई, तांबोळी सर, रणवरे सर, घाडगे सर, तनपुरे ताई, बनकर ताई इत्यादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे खूप खूप अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
<no title>नम्रता जगदीश सावळे (पटणे)कोल्हापूरच्या "नॅशनल युनिटी अवॉर्ड" पुरस्काराने सन्मानित